कोरेगाव: रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही : डॉ. संगमेश कोडे
रहिमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता दिली. नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ही प्रक्रिया 17 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.