सेलू: जलवाहिनीच्या कामात कंत्राटदाराने शेताची लावलीय वाट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Seloo, Wardha | Nov 20, 2025 सेलू शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ कोटी रुपयांच्या अमृत योजनेचे काम सुरू आहे. बोरधरण येथे विहीर खोदून तेथून सेलू शहरात उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याकरिता जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामात कंत्राटदाराने शेतकऱ्यांनी परवानगी न घेता शेताच्या बांधासह कुंपणाचीही वाट लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून जबरीने सुरू असलेले हे काम तात्काळ बंद करावे. अशी मागणी ता. २० गुरुवारला दुपारी ३ वाजता शेतकऱ्यांनी केली आहे.