नाशिक: पिंडकौलमधून वारकरी परंपरेतील विद्रूप स्पर्धेचा वास्तववादी वेध
Nashik, Nashik | Nov 29, 2025 वारकरी संप्रदायाचा शतकानुशतकांचा अध्यात्मिक वारसा, विठ्ठलनामाची परंपरा आणि आत्मज्ञानाचा सोपा मार्ग समाजाला दिला. पण त्याच परंपरेत स्वार्थ, प्रसिध्दीची लालसा आणि संधीसाधूपणाची वाढती पाळेमुळे यावर भाष्य करणारे प्रायोगिक नाटक ‘पिंडकौल’ प्रेक्षकांसमोर वास्तवाचे तीक्ष्ण प्रतिबिंब ठेवते. महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित ‘कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या दोन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग प्रेक्षकांनी दाद देत पाहिला.