पत्नी व मुलगी परपुरुषासोबत रहात असल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.फिर्यादी महिला ही त्र्यंबकरोडवरील सिटीलिंक बस कार्यालयातील दत्त मंदिरात दर्शन घेऊन मंदिराबाहेर आली होती. त्यावेळी आरोपी प्रसाद शामलाल शिरसाट हा तेथे आला.फिर्यादी महिला ही पतीला सोडून राकेश नावाच्या व्यक्तीसोबत मुलीसह रहात असल्याने फिर्यादीसह राकेश याचा सूड घेण्याच्या उद्देशाने आरोपीने धारदार चाकूने मारहाण केली.