रामटेक: मोगरकसा जंगल सफारी क्षेत्रात काळ्या बिबट्याचे दर्शन ; पर्यटकांचा ओढा वाढला
Ramtek, Nagpur | Nov 28, 2025 पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोगरकसा जंगल सफारी क्षेत्रात मागील काही दिवसांपासून दुर्मिळ काळा बिबट वावरत असल्यामुळे पर्यटकांमध्ये कमालीचे औसुक्य बघावयास मिळत आहे. अशातच शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबरला सकाळी सहा ते साडेसहा वाजता च्या दरम्यान या क्षेत्रात जंगल सफारी करीत असताना शिवमंदिर परिसरात पर्यटकांना काळाबिबट्याचे दर्शन झाले.