शिरोळ: हुपरी गावाच्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय, सामान्य नागरिक हे फक्त फाळा आणि कर भरण्यासाठीच आहेत काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गाव हे चांदी व्यवसायासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जवळच असलेला जवाहर साखर कारखाना आणि पंचतारांकित एमआयडीसीमुळे हे गाव आता एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र बनले आहे. त्यामुळे येथे केवळ स्थानिकच नव्हे, तर बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांचीही मोठी वर्दळ असते.यामुळे गावातील लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढलेली आहे.मात्र दुर्दैवाने,हुपरी गावाच्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.