हातकणंगले: इचलकरंजीत मटण दरवाढीविरोधात संताप; खवय्ये आणि दोस्ती ग्रुपचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
इचलकरंजी शहरात १२ सप्टेंबरपासून मटणाच्या दरात तब्बल ४० रुपयांची वाढ करण्यात आली असून, सद्यस्थितीत दर ७६० रुपये किलोवर पोहोचला आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून, दरवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी ‘खवय्ये आणि दोस्ती ग्रुप’ तर्फे आज बुधवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले.