मलकापूर: मलकापूर शहरातील इसमाचा देऊळघाट येथील विहिरीत आढळला मृतदेह
देऊळघाट येथील बसस्थानकाजवळील विहिरीत ९ नोव्हेंबर रोजी एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत इसमाची ओळख मोहम्मद शरीफ रा .मलकापूर अशी असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.याबाबत माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती १० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.