तिरोडा: रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला, मांडवी ते चांदोरीदरम्यान घटना
Tirora, Gondia | Nov 30, 2025 रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असलेला टिप्पर पोलिसांनी तिरोडा तालुक्यातील ग्राम मांडवी ते चांदोरी मार्गावर पोलिसांनी पकडला. ही कारवाई शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी ४:३० वाजता करण्यात आली.टिप्पर चालक शिशुपाल अनंतराम मेश्राम (३३, रा. डोंगरी बुज, जि. भंडारा) हा टिप्पर क्रमांक एमएच ४०-डीसी ५३५९ मध्ये रेतीची वाहतूक करीत असताना त्याला पेट्रोलिंगवरील पोलिस पथकाने मांडवी ते चांदोरी मार्गावर पकडले. तपासणीत टिप्परमध्ये पाच ब्रास रेती भरलेली आढळली. र