निफाड: निफाड चे इंद्रजीत श्रीवास्तव ठरले विज्ञान विभागाच्या शिष्यवृत्तीचे मानकरी
Niphad, Nashik | Nov 15, 2025 इंद्रजीत श्रीवास्तव ठरले विज्ञान विभागाच्या शिष्यवृत्तीचे मानकरी निफाड ( वार्ताहर ) निफाड येथील युवा संशोधक इंद्रजीत रतनलाल श्रीवास्तव यांना भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे मानाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जवाहरलाल नेहरू उन्नत वैज्ञानिक अनुसंधान केंद्र यांच्या वतीने देशातील निवडक संशोधकांना विज्ञानातील महत्त्वपूर्ण संशोधन कार्यासाठी SRFP शिष्यवृत्ती दिली जात असते.