हिंगणघाट: नगरपालिका निवडणूकीसाठी प्रशासन पूर्णत सज्ज:कायदा व सुव्यवस्थेसाठी २०० पोलिस अधिकारी कर्मचारी तैनात
हिंगणघाट उद्या २,डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता तहसील कार्यालयात आज पासूनच बुथनिहाय प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली. प्रत्येक कर्मचार्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आणि सतर्क मोडमध्ये आहे. शहरातील वाढत्या निवडणुकीच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.नगर परिषद निवडणुकीची संपूर्ण तयारी निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.