राहुरी: राहुरीमध्ये परिवर्तन घडेल ,युवा नेते अक्षय कर्डिले
आज सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह बघावयास मिळतोय, मतदारांमध्ये एक बदलाची भावना आहे. राज्यात केंद्रात आपलं सरकार आहे. त्यामुळे विकास देखील आपणच करू शकतो अशी आशा मतदारांमधे आहे. त्यामुळे यावेळी राहुरी नगर परिषदेत परिवर्तन घडेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. आज मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.