नगरपंचायत निवडणुकीत अनेकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्याविरोधात पाच प्रभागांतील सहा जणांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यातील तिघांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले, तर तिघांच्या अपिलावरील निर्णय राखून ठेवला आहे.