इंदापूर: सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिगवण पोलिसांनी घेतले ताब्यात
Indapur, Pune | Nov 7, 2025 सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिगवण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी आरोपीकडून तब्बल ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.गणेश शिवाजी कारंडे (वय ४३, रा. श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे