ठाणे: दुबार आणि बोगस मतदार यादी आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात मनसेच्या वतीने अनोखी बॅनरबाजी, वेधले सर्वांचे लक्ष
Thane, Thane | Nov 10, 2025 महाराष्ट्रामध्ये दुबार आणि बोगस मतदार मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने सातत्याने केला जात आहे. एका सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोगस मतदारांची यादी देखील दाखवली मात्र निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून काम करत असून निवडणूक आयोगाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे असा आरोप करत अशा आशयाचे बॅनर ठाण्यातील नितीन सिग्नल परिसरात मनसेच्या वतीने लावण्यात आले आहेत. तसेच मुख्य रस्त्यावर लावलेले हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.