निफाड: निफाड तालुक्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; आठवड्यातील दुसरी घटना ; नापिकी व कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Niphad, Nashik | Nov 4, 2025 .४ नोव्हेंबर २०२५ :- गेल्या सहा महिन्यांपासून पडत असलेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दैनंदिन जीवनमान कसे चालवायचे आणि वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेतून शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याच्या घटना वाढत आहेत. कालच निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज पाचोरे वणी ता.निफाड येथील रंगनाथ नामदेव वाटपाडे (वय ७५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने परिसरा