माण: डॉ. संपदा मुंडे मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक; दहिवडीत प्रशासनाला निवेदन सादर, राज्य सरकारवर जोरदार टीका
Man, Satara | Oct 29, 2025 फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला असून दहिवडी येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माण तालुका प्रशासनाला निवेदन सादर केले. या वेळी पक्षाने राज्य सरकारवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या निष्क्रीय कामकाजाचा पंचनामा करण्यात आला.