सेलू: रिधोरा शेत शिवारातून शेतातील साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध सेलू पोलिसात तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 19, 2025 वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणाकरिता शेतात लावलेले साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना दि. १८ ला मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील रिधोरा शिवारात घडली. याप्रकरणी मोरेश्वर मारोतराव इवानाथे रा. रिधोरा यांनी दुपारी १२.१५ वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ता. १९ बुधवारला सेलू पोलिसांनी दिली.