शिर्डीतील विठ्ठलवाडी येथे रात्री २च्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली आहे. अर्चना सुभाष घोरपडे यांचे विद्या ब्युटी पार्लर चोरट्यानी फोडत तब्बल २२ हजार रोख राकाम चोरत इतर साहित्याचेही नुकसान केलं आहे.शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी येत नुकसानाची पाहणी केली आहे. दरम्यान अर्चना घोरपडे यांनी चोरट्यांचा लवकर शोध घ्यावा व आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.