अर्जुनी मोरगाव: तिडका/करडगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारत व एकलव्य पुतळा सभामंडप इमारतीचा लोकार्पण संपन्न
तिडका/करडगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारत व एकलव्य पुतळा सभामंडप इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत सर्वांगीण विकास, दर्जेदार शिक्षण आणि ग्रामविकासाच्या आगामी योजनांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.