राधानगरी: कुंभोजमध्ये ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांची तब्येत खालावली, उपोषणामुळे ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण
कुंभोज येथील बाजारपेठ जागेच्या प्रश्नावर आमरण उपोषणाला बसलेले ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांची आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तब्येत तिसऱ्या दिवशी गंभीरपणे खालावली आहे.उपोषण स्थळी वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिनंदन पाटील व सिस्टर चैत्राली कांबळे यांनी तपासणीनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.उपोषणामुळे त्यांची प्रकृती कमकुवत झाली आहे.