रामटेक: रामटेक - भंडारा मार्गावरील शिरपूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने कट मारल्याने खाली पडून 19 वर्षीय युवतीचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Oct 30, 2025 पो.स्टे. रामटेक अंतर्गत येणाऱ्या रामटेक - भंडारा मार्गावरील शिरपूर बोरी फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार एका 19 वर्षीय युवतीचा खाली पडून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 29 सप्टेंबरला सायंकाळी 6. 45 वा.च्या दरम्यान घडली. मृतक युवतीचे नाव तमन्ना गंगाधर नगराळे वय 19 वर्षे रा. भेंडाळा ता. मौदा जि. नागपूर असे आहे. रामटेक पोलिसांनी याची नोंद घेतली असून गुरुवार दि. 30 ऑक्टोम्बर ला शवाचे उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.