सेलू: तिघांनी एकास काठी व लाथा बुक्क्यांनी केली मारहाण; कोलगाव शिवारातील घटना, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Nov 25, 2025 शेतातील धुऱ्यावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एकास काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मौजा कोलगाव (लोंढापूर) शेतशिवारात घडली. या प्रकरणी अमोल वामनराव पोहाणे (वय ३४, रा. घोराड) यांच्या फिर्यादीवरून मंगेश पोहाणे, सचिन पोहाणे आणि सुनील पोहाणे (सर्व रा. घोराड) या तिघांविरुद्ध रात्री ७.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ता. २५ मंगळवारी सेलू पोलिसांनी दिली.