मंगरूळपीर: शेलुबाजार..'आनंदी रूम' प्रकल्पाला दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार.क्षितिज फाऊंडेशनच्या हे प्रकल्प.
आज दिनांक २७ नॉव्हेंबर २०२५ गुरुवार रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील क्षितिज बहुउद्देशीय संस्थेच्या 'आनंदी रूम' प्रकल्पाला मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया समिटमध्ये हा प्रतिष्ठेचा 'बेस्ट इनोव्हेशन अँड सोल्यूशन लीडरशिप इन मेनस्ट्रुअल हायजिन मॅनेजमेंट (१) अवॉर्ड' क्षितिज फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल चौधरी (कदम) यांना प्रदान करण्यात आला.