उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये चोरट्यांचा हैदोस; दुकानदारांना बोलण्यात गुंतवून अनेक ठिकाणी चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगर मध्ये चोरट्यांनी हैदोस घातलेला पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक ठिकाणच्या दुकानांमध्ये काहीतरी खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला बोलण्यात गुंतवून चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका हार्डवेअरच्या दुकानातील चार हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली तर कपड्याच्या दुकानांमध्ये देखील चोरी केली. तसेच अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या असल्याचे समोर आले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान केले जात आहे. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.