नाशिक: सातपूर शिवाजीनगर भागातील निगळ पार्क येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत करणाऱ्या तिघांना अटक
Nashik, Nashik | Sep 17, 2025 सातपुर भागातील शिवाजी नगर, निगळ पार्क भागात घरासमोर उभ्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. तोडफोड करणाऱ्याना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिवाजी नगर भागात घरावर दगडफेक करण्याबरोबरच घरासमोर पार्क केलेल्या ट्रक,कार यांच्या काचा फोडल्या. तसेच हातात लोखंडी कोयते घेऊन जोरजोराने आरडा ओरडा केला. घटनास्थळी सातपूर पोलिसांनी तिघांना अटक करून चांगलाच चोप दिला आहे.