बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर तसेच भद्रावती व वरोरा परिसरात एकाच दिवशी तीन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. यामुळे रेल्वेमार्गासह राष्ट्रीय महामार्गही वनजीवांच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे. वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ४१३ मध्ये चंद्रपूरकडे येणाऱ्या प्रवासी रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा मृत्यू झाला