मेहकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, मतदानाच्या एक दिवस आधीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय फायदा झाला आहे. बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. सारिका शिवाजी गवई यांनी आज दिनांक १ डिसेंबर रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेला जाहीर पाठिंबा घोषित केला आणि अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला.