शहादा: शहादा नगरपालिका समोरून मोटरसायकल चोरी
दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान शहादा नगरपालिका समोरून दिनेश पवार यांची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एएन 3823 ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. याबाबत दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी दिनेश पवार यांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.