तुमसर: झंडीटोला येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर गोबरवाही पोलिसांची धाड, ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर तालुक्यातील झंडीटोला येथे दि. 9 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी दुर्योधन बंडू धुर्वे यांच्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीत ठेवलेले 450 किलो मोहपास सडवा असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.