चंद्रपूर: चंद्रपुरात जिजाऊ ब्रिगेडचे तीन दिवसीय महाअधिवेशन
२१, २२ आणि २३ नोव्हेंबर आयोजन;पत्रकार परिषदेत जिजाऊ बिग्रेडची माहिती
महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक विचारपीठ असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीन दिवसीय महाअधिवेशनाचे आयोजन चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे. २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान होणारे हे अधिवेशन प्रियदर्शिनी सभागृहात आयोजित केले असल्याचे आज दि.२ नोव्हेंबर दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत जिजाऊ बिग्रेड जिल्हाध्यक्ष अर्चना चौधरी यांनी सांगितले.यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.