केज: देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना माफी नाही,फासावर चढवण्यासाठी आम्ही धनंजय देशमुखांच्या पाठीशी ठाम,आमदार सुरेश धस
Kaij, Beed | Nov 29, 2025 देशमुख हत्या प्रकरणातील अजूनही फरार असलेला आरोपी लवकरात लवकर पकडला जावा, तसेच आतापर्यंत अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे गुन्हेगारच आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य आणि कायदेशीर पद्धतीने सुरू असून कोणालाही माफीनामा मिळणार नाही, असे ठाम मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले.मसाज योग येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या क्रूर हत्येतील सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फासावर चढवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. या लढ्यात आम्ही धनंजय देशमुख यांच्या पाठीमाग