सातारा: जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Satara, Satara | Nov 6, 2025 सातारा जिल्ह्यातील 9 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली, जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 1 लाख 91 हजार 464 आहे, तर महिला मतदार 1 लाख 94 हजार 732 असून, इतर मतदार 59 असून, एकूण मतदार 3 लाख 86 हजार 455 आहे तर एकूण मतदान केंद्र 437 असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले