१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात 'सेवा पंधरवाडा' साजरा, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राज्यात 'सेवा पंधरवाडा' साजरा करणार आहे. या पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन आणि क्रीडा स्पर्धा यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.