औसा: औसा तालुक्यातील भादा–सावरी परिसरात उसाला आगीची तडाखा; चार एकर ऊस जळून खाक
Ausa, Latur | Nov 28, 2025 औसा -औसा तालुक्यातील भादा व सावरी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल चार एकर ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.भादा शिवारात महावितरणच्या वीजतारा अचानक तुटून पडल्या. त्या वेळी प्रवाह सुरू असल्याने तारा एकमेकांवर घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या आणि शेतकरी विजयकुमार मंत्री यांच्या दोन्ही एकर ऊसाला आग लागली.आगीची माहिती कळताच प्रशांत पाटील व दिपक मानधने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.