कारंजा: विहिरीचे खोदकाम सुरू असताना झुल्यावरून पडून मजुराचा झाला मृत्यू.. बोंदरठाणा शिवारातील घटना
Karanja, Wardha | Nov 24, 2025 बोंदरठाणा शिवारात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या कामावर असलेल्या मजुराचा झुल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली यामुळे एकच खडबड उडाली इतर मजुरांनी जखमी मजुराला बाहेर काढून त्वरित कारंजा ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले राजू डोमाजी पठाडे वय 39 वर्ष असे मृतकाचे नाव आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली