संगमनेरमध्ये वृद्ध महिलांचे दागिने हिसकावणारे दोन सराईत चोर जेरबंद नगर : संगमनेर तालुक्यात वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा व संगमनेर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अटक केली. काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी गुप्त पथके तैनात करून या आरोपींना पकडले. पोलिस तपासात दोघांवर बारामती, निगडी, भोर आणि पुणे येथे सहा गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. संशयितांची चौकशी सुरू असून पुढील तपास संगमनेर पोलिस करत आह