अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी हे पाथर्डी शिवारात राहतात.आरोपी मुन्ना बिरजू भारद्वाज याने फिर्यादीच्या मुलीस पाथर्डी शिवार, पाथर्डी फाटा, सवंदगाव, मालेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.