हवेली: पिंपळे सौदागरमध्ये स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; सात तरुणींची सुटका; बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी केली शहानिशा
Haveli, Pune | Nov 30, 2025 गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पिंपळे सौदागरमधील “The Aura Thai Spa” मध्ये स्पाच्या आड चालणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. कारवाईदरम्यान पोलिसांनी इतर राज्यांतील सात तरुणींची सुटका केली.याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक अभिजित लोरन्स (वय ३०, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम, केरळ) याला अटक केली आहे.