मोहाडी: भंडारा- वरठी ते तुमसर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवून खा. प्रशांत पडोळे यांनी वेधले शासन प्रशासनाचे लक्ष
भंडारा-वरठी ते तुमसर राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आज दि. 9 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी 3 वाजता भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, सदर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी केली.