कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर रक्तबंबाळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Kalyan, Thane | Nov 7, 2025 आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 च्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर रक्तबंबाळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुदेव हॉटेलकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर सुमारे 20 ते 22 वर्षांच्या तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्रवाशांच्या नजरेस पडलेला हा मृतदेह पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. माहिती मिळताच कल्याण माहात्मा फुले पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.