चांदूर रेल्वे: अशोक नगर येथे वृद्ध महिलेला काठीने मारहाण; युवकावर पोलिसात गुन्हा दाखल
गंगुबाई बारबुदे वय वर्ष साठ हिने सुरज बारबुदे याच्या विरोधात कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे .सुरज हा नेहमी सदर महिलेसोबत दारू पिऊन वाद करीत होता. सुरजाने घराच्या भिंतीवरील इलेक्ट्रिक बोर्ड पडल्याच्या कारणावरून वाद केला व काठीने सदर फिर्यादी महिलेच्या डाव्या हाताच्या बोटावर मारले त्यामुळे रक्त निघाले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सदर वृद्ध महिलेने कुऱ्हा पोलिसात दिली आहे. तेव्हा सुरज विरोधात विविध कल्पना नव्हे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.