माण: माण तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथे भक्तांचा महापूर; दर्शनासाठी अलोट गर्दी
Man, Satara | Oct 24, 2025 रामनामाची महती संपूर्ण जगाला सांगणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीस्थळी म्हणजेच माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे सध्या रामभक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून गर्दीचा महापूर होता. दीपावलीचा आनंद साजरा करत रामभक्त सध्या महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावत आहेत. दिवाळीनिमित्त समाधी मंदिर परिसरात केलेले आकर्षक फुलांची सजावट तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्या या भक्तांचे मन भरून टाकत आहेत.