शिरूर: शिरूरमधील घरफोडी प्रकरण उघडकीस; सोन्या-चांदीच्या दागिनांसह मुद्देमाल जप्त
Shirur, Pune | Dec 5, 2025 शहरातील रामलिंग हत्ती रस्ता परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत शिरूर पोलिसांनी थोड्याच अवधित आरोपीला जेरबंद केले आहे. तपास पथक आणि आयकार युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीकडून तब्बल १ लाख १४ हजार ९०० रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.