नागपूर शहर: दिल्लीतील स्फोटानंतर नागपूर शहर हाय अलर्ट वर, संवेदनशील ठिकाणी वाढविण्यात आली सुरक्षा
दहा नोव्हेंबरला सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ल्या वर झालेल्या स्फोटानंतर उपराजधानी नागपूर शहर पोलिसांनी हाय अलर्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही संभाव्य धोक्याला टाळण्यासाठी शहरात कडक सुरक्षा व उपाय योजना लागू करण्यात आले आहे. नागपूर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलीस प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी काल रात्रीपासूनच करत आहे. यामध्ये प्रवाशांच्या बॅग देखील तपासण्यात येत आहे. नागपूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर देखील पोलिसां