नाशिक: पांडवलेणे परिसरात एका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर लागली आग , आगनियंत्रक पथकाने आणली आटोक्यात
Nashik, Nashik | Nov 29, 2025 पांडवलेणी फाळके स्मारक परिसरात पहाटेच्या सुमारास एका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. याठिकाणी तात्काळ अग्नीशामक यंत्रणा दाखल झाल्याने अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. मात्र हॉटेलचे यात मोठे नुकसान झाले.