सेलू: गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यावर दहेगाव येथे पोलिसांची कारवाई; ₹१३०८०० चा मुद्देमाल जप्त; दहेगाव पोलिसांची कारवाई
Seloo, Wardha | Nov 29, 2025 दहेगाव गोसावी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला पकडत १ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दहेगाव गोसावी ते हमदापूर रोडवर दहेगाव पोलिसांनी केली. अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.