सातारा: 4 दिवसांत सातारा नगरपालिकेच्या तिजोरीत 19 लाखांचा कर जमा, नगरसेवक-नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार घरपट्टी एनओसीसाठी दाखल
Satara, Satara | Nov 9, 2025 सातारा : सातारा नगरपालिकेच्या तिजोरीत अवघ्या चार दिवसांत तब्बल 19 लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने घरपट्टी एनओसी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून कर भरण्याची मोठी गर्दी नगरपालिकेत होत आहे.निवडणुकीसाठी अर्ज करताना उमेदवारांना घरपट्टीसह विविध करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (एनओसी) सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांनी मागील थकबाकी तत्काळ भरल्याने नगरपालिकेच्या महसूल विभागाला कर संकलनात मोठी वाढ झाल.