हवेली: दिल्ली ब्लास्टनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड हाय अलर्टवर; शहरात कडक पोलीस बंदोबस्त
Haveli, Pune | Nov 11, 2025 दिल्लीतील स्फोटानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शहर पोलीस दलाच्या वतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त आणि नाका बंदी लावण्यात आली आहे. महामार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांची काटेकोर तपासणी सुरू आहे.