रामटेक: खुमारी टोल प्लाजा येथे नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न
Ramtek, Nagpur | Nov 27, 2025 गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता पासून नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील ओरिएंटल टोल प्लाजा खुमारी येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माधव नेत्रालय व ओरिएंटल टोल प्लाझा यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात या महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या चालक व वाहक यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना चष्मे वितरित करण्यात आले.